ऑनलाईन फॅशन ब्रँड यशस्वीरित्या सुरु करण्याच्या ९ स्टेप्स
आपल्याला माहित आहे का की येणारा काळ हा प्रत्येकालाच बेसिक लेवल वर आणणारा आहे. नोकरी करणं हे देखील जिगरीचं आणि कठीण झाले आहे.मोठमोठ्या कंपन्यांमध्येही नोकरी कपात सुरू झाल्या आहेत,आणि या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून की काय स्वतःचे अस्तित्व ऑनलाईन टिकविता येणे सहज शक्य आहे. फॅशन ही कधीही संपुष्टात न येणारी कला आहे. त्यामुळे या कलेचा योग्य वापर करून तुम्ही नक्कीच नफा मिळवू शकता व येणार्या काळात एक यशस्वी फॅशन ब्रँड म्हणून मार्केट मध्ये स्वतःचे नाव कमावू शकता.शून्यातून नवीन व्यवसाय सुरू करणं नक्कीच सोप नाही परंतू ते अशक्यही नाही आहे.*लक्षात ठेवा* हजारो मैलांचा प्रवास हा नेहमी एका पावलाने सुरू होत असतो.सर्व नामांकित फॅशन ब्रँड ची सुरूवात ही अशाच एका कृतीतून झाली आहे.
बहुतेकदा कौशल्य असुनही नेमकी कोणती कृती पहिली करायची हे माहीत नसते.वेळेचे नियोजन, आर्थिक नियोजन कसे करायचे हेही माहीत नसते.एक फॅशन ब्रँड सुरू करण्यासाठी बर्याचशा प्रोसेस मधून आपल्याला जावे लागते. परंतु त्याबद्दल काही अंशीच ज्ञान असते. नेमके काय,कधी आणि कसे करायचे याचे मार्गदर्शन मिळाले तर मात्र या व्यवसायाची सुरूवात करणे अगदी सोपे आहे.
तुम्ही जर फॅशन डिझाईनर असाल,किंवा बरीच वर्षे या क्षेत्रात शिवणकाम करत असाल किंवा तुमच्या कडे व्यवसायिक दृष्टिकोन असेल तर खाली दिलेल्या ९ स्टेपस् वापरून तुम्ही तुमचा ऑनलाईन फॅशन ब्रँड यशस्वीरित्या सुरू करू शकता.
१. आपल्या व्यवसायाचे म्हणजेच फॅशन ब्रँडसाठी योग्य नाव, लोगो आणि मार्केट प्रोफाईल तयार करा.
२. मार्केटची नेमकी गरज काय आहे ते ओळखणे.
कोणताही फॅशन ब्रँड हा त्याच्या संस्थापक डिझायनर मुळे यशस्वी होत नाही, तर मार्केटमध्ये नेमक्या कोणत्या डिझाईनस् ची कशी गरज आहे हे ओळखून, त्याचा पुरवठा करून व आपल्या ग्राहकांच्या मनात स्थान निर्माण करूनच मोठा होतो. त्यामुळे असे कोणते कपड्यांचे डिझाईनस् आहेत जे इतर कपड्यांच्या कंपन्यांद्वारे विकले जात नाहीत याचा अभ्यास करून त्याची निर्मिती करणे गरजेचे आहे.
३. यशस्वी बिझनेस प्लान बनविने.
एक चांगला Business Plan म्हणजेच व्यवसायाची योजना विकसित करावी, जी एक फॅशन डिझायनर ते कपडे निर्माता म्हणून आपल्याला संपूर्ण प्रवासाचे मार्गदर्शन करेल. आपल्या कपड्याच्या डिझाईनस् चे अंतिम लक्ष्य काय आहे हा प्रश्न स्वतःला विचारा. म्हणजेच BIBA, WESTSIDE किंवा तत्सम कंपन्यांसाठी प्रायव्हेट लेबल तयार करायचे आहे का? एखाद्या मोठ्या बुटीक मध्ये विक्री होणारा प्रीमियम ब्रँड तयार करायचा आहे का? किंवा एखाद्या ई-कॉमर्स वेबसाइट साठी आपला ब्रँड बनवायचा आहे हे ठरवायला हवे. आपले ध्येय व्यवस्थित ओळखा आणि त्याप्रमाणे बिझनेस प्लान बनवा.
४. आपल्या ब्रँड साठी कलेक्शन डिझाईन करा.
ही स्टेप अतिशय महत्वाची आहे.आत्ता पर्यंत मार्केटची नेमकी गरज ,आपला ग्राहक कोण आहे ,तसेच आपले डिझाईन नेमके कोण कोणत्या प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी जाणार आहे या सगळ्याचा अंदाज आपल्याला आला आहे. आपले मार्केटमधील हे पहिले डिझाईन कलेक्शन आपल्याबद्दल एक फॅशन डिझायनर म्हणून बरेच काही सांगुन जाईल. त्यामुळे या पहिल्या तसेच यापुढील डिझाईन कलेक्शन साठी योग्य (Inspiration)प्रेरणा घ्या. तुमच्या डिझाईनच्या आयडियाज या इतरांपेक्षा वेगळा असणं गरजेचं आहे.ग्राहकाला तेच आवडते जे इतरांपेक्षा वेगळे असते. *डिझाईन कलेक्शन साठी इन्स्पिरेशन कसे घ्यायचे* हे व्यवस्थित समजणे गरजेचे आहे. तसेच डिझाईन बनवताना आपले डिझाईन हे मॅन्युफॅक्चरिंग च्या दृष्टीने cost effective कसे होईल हे लक्षात असू द्यावे. प्रत्येक कलेक्शन ला एक छान नाव द्या,आणि प्रत्येक डिझाईन ला एक नंबर द्यावा, म्हणजे भविष्यात ऑर्डर ट्रॅक करताना आणि स्टाॅक नोंद करताना त्याचा उपयोग होईल.
५. डिझाईन कलेक्शनचा Pre-production Sample म्हणजेच उत्पादन पूर्व नमुना तयार करा.
*गारमेंट डिझाईनिंग प्रोसेस* मधील सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे डिझाईन स्केच जे पेपर वर केले होते त्याप्रमाणे कापड कापून त्याचे सॅम्पल तयार करणे हे होय.आपण जर स्वतः सॅम्पल शिवणार असाल तर ही प्रोसेस खूप सोपी आहे, कारण एक फॅशन डिझायनर म्हणून आपल्याला या डिझाईन ची उंची, रुंदी ,फॉल आणि सर्व डिटेलिंग व्यवस्थित माहिती असतात. परंतु हेच काम कारीगर मास्टर कडून करून घेणे थोडे अवघड असू शकते. म्हणूनच एक फॅशन डिझायनर म्हणून तुम्हाला *प्राथमिक शिवणकामाचे ज्ञान* असणे अत्यंत गरजेचे आहे. डिझाईनचे सँम्पल हे शक्यतो मसलीन (मांजरपाट)कापड वापरून तयार केले जाते. त्याचा फिट हा त्या साईजच्या डमी वर तसेच प्रत्यक्ष मॉडेल ला घालून पाहिला जातो आणि अशाप्रकारे मंजूर झालेला Preproduction Sample हा Mass Production साठी Clothing मॅन्युफॅक्चरर्स कडे जातो.
६. डिझाईन कलेक्शन मधील प्रत्येक स्टाईल ची किंमत ठरवा.
कोणत्याही स्टाईल ची( गारमेंट)किंमत ठरविताना त्यात production cost कव्हर झाली पाहिजे. तसेच आपल्या संभाव्य ग्राहकाला देखील ही किंमत परवडली पाहिजे. म्हणूनच हीआपल्या फॅशन व्यवसाय यशस्वी बनवण्याची महत्वाची स्टेप आहे.
७.
आपल्या
डिझाईन कलेक्शन चे फोटो शूट करा.
आपल्या डिझाईन कलेक्शनचे सॅम्पल फिटिंग आणि फिनिशिंग च्या प्रक्रियेतून मंजूर झाल्यावर त्याचे योग्य पद्धतीने फोटोशूट होणे गरजेचे आहे ,कारण त्यामुळेच आपले डिझाईन घातल्यावर कसे दिसते हे आपल्या ग्राहकाला समजते. सर्वच E-commerce प्लॅटफॉर्मवर आपण आपल्या डिझाईनची विक्री करणार असाल तर तिथे अशाप्रकारे फोटो शूट केलेले फोटोज पांढरा पृष्ठभाग ठेवून अपलोड करावे लागतात.
८.
डिझाईन
कलेक्शन चे मार्केटिंग सुरू करा.
फोटोशूट झाल्यानंतर ,आपल्या Business Plan प्रमाणे आपल्या डिझाइन्सचे मार्केटिंग करायला सुरुवात करा. डिझाईनच्या प्रत्येक फोटो सोबत त्याचा योग्य तपशील म्हणजे कापडाचा प्रकार रंग, साईज , तसेच थोडेसे डिझाईन फिट प्रकाराबद्दल माहिती देणे गरजेचे आहे. आपल्या डिझाईनचा ग्राहक कोणत्या वयोगटातील आहे त्याप्रमाणे आपण आपल्या मार्केटिंगचे धोरण आखू शकता. तसेच आपले डिझाईन कोणत्या प्लॅटफॉर्मवर विक्रीस ठेवायचे आहे हेदेखील ठरवणे त्यामुळे सोपे जाईल. उदाहरणार्थ Instagram,YouTube, Facebook इत्यादी प्लॅटफॉर्म अतिशय उपयोगी आहेत. थोडक्यात काय तर आपला ग्राहक जिथे असणार तिथे आपले प्रॉडक्ट दिसणे गरजेचे आहे.
९. बँक अकाउंट ओपन करा.
बँक अकाउंट आपल्या ब्रँड च्या नावाने उघडा. त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची लिस्ट तयार करा. बँक अकाऊंट उघडल्यानंतर आपली खऱ्या अर्थाने आपल्याला ओळख होते. डिझायनिंग चक्र हे या स्टेपला पूर्ण होते. बऱ्याचश्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आपले बँक अकाउंट लिंक केले जाते त्यामुळे आपले डिझाईन विकले गेल्यावर पैसे थेट आपल्या बँक अकाउंट मध्ये जमा होतात.
हा लेख संपूर्ण वाचल्या बद्दल धन्यवाद!!
• जर आपण आपल्या फॅशन ब्रँड सुरू करण्याच्या प्रवासात गोधंळलेले असाल,
• आत्तापर्यंत फॅशन ब्रँड सुरू करण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न जर उपयोगी आले नसतील,
• किंवा जर आपण असे म्हणत असाल," की मला माहीतच नाही की नेमकी कुठून सुरुवात करायची.
तर आपण योग्य पोस्ट वाचत आहात.यामधील कोणत्याही स्टेप संदर्भात आपल्याला मार्गदर्शन हवे असेल तर आपले प्रश्न कंमेट बाॅक्स मध्ये लिहा. आपला फॅशन ब्रँड यशस्वी रित्या सुरू करण्यासाठी,तुम्ही कोणत्या स्टेप ला आहात हे समजून घेऊन मी आपल्याला योग्य मार्गदर्शन करू शकेल.धन्यवाद
मानसी कोयंडे










छान माहिती दिली आहे.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा
उत्तर द्याहटवाVery good 9 steps
Very useful
Nitin Patil
Great Manasi! Agadi A to Z mahiti dili aahes fashion line madhe successful honyasathi. Very informative. Keep it up 👏👏👏
उत्तर द्याहटवाChan mahiti. .
उत्तर द्याहटवाखूप छान माहिती स्टेप बाय स्टेप दिली आहे.
उत्तर द्याहटवाखुपच छान अशी उपयुक्त माहिती दिली आणि याचा प्रत्येकाला त्याच्या भावी आयुष्यात फॅशन डिझायनिंगमध्ये खूप चांगल्या प्रकारे मदत होईल.
उत्तर द्याहटवाविद्या चव्हाण ,🙏
Very very nice
उत्तर द्याहटवा