या ९ मानसिकता ज्या आपल्याला आपला फॅशन ब्रँड सुरू करण्यासाठी पासून थांबवित आहेत.
या ९ मानसिकता ज्या आपल्याला आपला फॅशन ब्रँड सुरू करण्यासाठी पासून थांबवित आहेत
आपल्याला माहित आहे का ? शिलाई मशीन बनविण्याच्या कितीतरी कंपन्या भारतात आणि जगभर आहेत. बऱ्याच लोकांकडे शिलाई मशीनस् आपल्याला पाहायला मिळतात. परंतु जर नीट निरीक्षण केले
तर असे लक्षात येईल की, अंदाजे 1000 शिवणकाम करणार्या व्यक्ती मधून फक्त 1किंवा 2 व्यक्तीच या कलेचा व्यावसायिक उपयोग करताना दिसतील.
का होतं असं?
नेमकी कोणती कारणं आहेत जी तुम्हाला तुमचे फॅशन ब्रँड सुरू करण्यापासून थांबवित आहेत.
चला जाणून घेऊया 9 प्रकारच्या शिवणकामाकडे बघण्याचा मानसिकता, ज्या जाणून घेतल्यावर तुम्ही कोणत्या प्रकारच्या मानसिकतेमध्ये येता हे तुम्हाला कळेल आणि त्यातून बाहेर पडून व्यावसायिक दृष्ट्या या कलेकडे कसे पाहायचे हे तुमच्या लक्षात येईल
पुर्वापार पासून आपण प्रत्येक घरात शिलाई मशिन पाहत आलो आहोत आणि आजही आपल्याला त्या ब-याच घरांमध्ये दिसतात. कुठेतरी किचनमध्ये, कुठेतरी बेडरुममध्ये, एखादया ठिकाणी हॉलमध्ये. ज्याला जशी जागा उपलब्ध असेल त्याप्रमाणे तो तिची जागा ठरवतो, म्हणजे 50% लोकांकडे शिलाई मशीन आहेत असे म्हणता येईल. पण मशिन असणे आणि तिचा योग्य वापर होणे या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. यासाठी शिवणाचे मानसिकता जाणून घेणे गरजेचे आहे.
1.शिलाई मशीन घरात असावी कारण त्यामुळे काही फाट्कतूटक् शिवता येईल, कधीतरी कपडे ऑल्टर करता येतील. हा एक दृष्टीकोन आपण पाहत आलो आहोत.
2. आवड म्हणून केवळ वेळ घालवण्यासाठी शिवणक्लासमध्ये ॲडमिशन घेतले जाते आणि महिन्याभरात शिलाईमशीन घरात येते,का तर Practice करता येईल. याही वेळेस आपण पाहिले तर मशीन असावी हाच दृष्टीकोन असतो आणि जोपर्यंत शिवणक्लास सुरु आहे तोपर्यंत किंवा त्यानंतर पुढे काही दिवस मशीनचे चाक फिरताना दिसते. आणि मग ती मशीन तशीच तिच्या जागी असते. कालांतराने तिच्यावरील मशीन खाली काढली जाते व लाकडी Platform चा टेबल म्हणून वापर केला जातो.
3. मुलीसाठी मशीन घेतली असेल , तर तिचे लग्न झाल्यावर मुलगी सासरी जाते व मशीन माहेरी रहाते.तसेच जर सुनेसाठी शिलाई मशीन घेतली असेल तर ,तिच्या पहिल्या बाळंतपणा पर्यंत ती मशीन वापरते व नंतर ती शिलाई मशीन तशीच तिच्या जागी रहाते व नंतर मुलं समजुतदार होईपर्यंत ती मशीन बंदच असते. लग्न, मुलं व मुलांचे Primary Education होत पर्यंत मशीन त्याच जागी असते किंवा ब-याच वेळा अर्ध्यां किंमतीत विकलीही जाते.
4. जेव्हा मुलं पूर्ण वेळ शाळेत जातात तेव्हा स्त्रीयांकडे बराच वेळ उपलब्ध व्हायला लागतो व आपण काहीच करत नाही ही भावना जागी होते आणि मग नेमके काय करायचे बरे म्हणून पुन्हा एकदा सुरुवात होते Career options शोधायला. मग ब-याच वेळा ब्युटीशियन,
टेलरिंग क्लास किंवा Fashion Designing हे पर्याय समोर येतात. Fashion Designing ला ॲडमिशन घेतले जाते व पुन्हा एकदा शिलाई मशीनवरची धूळ साफ केली जाते व तिच्यात जीवंतपणा आणला जातो. यावेळी मशीन वापरताना थोडी Maturity आलेली असते. काहीतरी Creative करणे, काहीतरी व्यवसाय करणे इत्यादी उद्देश सुरु होतात आणि पुन्हा एकदा शिवणकाम शिकायला सुरुवात होते. फक्त यावेळेस थोडया समजदारीने, घरच्या जबाबदा-या सांभाळत शिवणाचे शिक्षण सुरु होते.
5. त्यातल्या त्यात अशाही व्यक्तींकडे मशीन पहायला मिळते ज्या नोकरी करतात. एक आवड किंवा Fashion Designing करायचे होते व आत्ता करत असलेल्या Career च्या अभ्यासात ते राहून गेले. मग ती तेव्हाचे आवड पूर्ण करायची म्हणून शिवण क्लासला ॲडमिशन घेतले जाते व घरात थोडीशी Automatic कमी जागा व्यापणारी शिलाई मशीन येते. मग वेळ मिळेल तसा मशीनचा वापर सुरु होतो.
6. मी अशाही व्यक्ती Ladies पाहिल्यात ज्या चांगल्या Post वर कार्यरत असतात, परंतु स्वत:चे कपडे त्या स्वत: शिवतात आणि त्या ते Enjoy करतात.
7. फॅशन इंडस्ट्रिमध्ये Industrial मशीन जास्त पहायला मिळतात तेथे कपडे शिवण्यासाठी कारागिर असतात. जे जास्त करुन पुरुषवर्ग असतात. आता इथे जे पहायला मिळते ते वेगळेच लहानपणापासून वडिलांबरोबर असल्याने शिवणाचे निरीक्षण केले जाते व हे कारागिर हळुहळु शिवणामध्ये पारंगत होतात. पण फक्त शिवणातच हा ! ब-याच प्रमाणात जर रेडी कटींग मिळाले तर हे कारागिर फार सराईतपणे कपडे शिवतात. पण इथेही आपण पाहिले तर शिवण करतानाची मानसिकता ही यांत्रिक असते. वेळ व नगाप्रमाणे शिवण केले जाते व त्याप्रमाणात पैसे दिले जातात.
8. व्यावसायिक दृष्टीकोनातून शिलाई मशीनचा वापर काही घरांतधील स्त्रियांमध्ये पहायला मिळतो. काही ठिकाणी नवरा व बायको दोघेही तो व्यवसाय घरातूनच सांभाळताना दिसतात. म्हणजे दिवसभर नवरा कामावर जातो व बायको घर सांभाळत शिवणकाम करते किंवा याउलट नवरा संध्याकाळी घरी आल्यावर शिवणाचे काम करतो. या दोन्ही प्रकारात लोकांचे कपडे पारंपारिक पद्धतीने शिवून अर्थांजन करणे हाच उद्देश दिसतो. म्हणजेच काय तर शिवणाची मानसिकता ही पारंपारिक पद्धतीने शिवण करणे ही आहे.
9. अशाही घरांमध्ये आपल्याला शिलाई मशीन Active दिसतात जिथे You tube बघून शिवणाचे नवनवीन प्रयोग केले जातात आणि कापड तर शिवले जाते परंतू unfinished कारण म्हणजे सरावाचा अभाव. म्हणजेच काय तर शिवण केले जाते परंतू Experiment म्हणून.
थोडक्यात काय तर शिवणशास्त्राला Career Option म्हणून पाहिले जात नाही. जर आपण आत्तापर्यंतची मानसिकता पाहिली तर लक्षात येईल की शिवण शिकले जाते का, तर वेळ जात नाही, आवड म्हणून, मुलगी काहीच करत नाही म्हणून, सुनबाई नवीन असेल तर मग कौतूक म्हणून, Carrier सुटलय आणि फक्त चूल आणि मुल करतेय ही भावना जागृत झाल्यावर, किंवा पारंपारिक पद्धतीने अर्थाजन करण्यासाठी, तसेच अगदी यांत्रिक पद्धतीने आणि अगदी टोकाचे म्हणजे Experimentive ही जर मानसिकता असेल तर शिवणशास्त्राचा करिअर म्हणून विचार केलाच जाणार नाही. कारण करिअर म्हणून तर शिवणशास्त्राचे शिक्षण फार कमी ठिकाणी घेतलेले पहायला मिळेल. Passion म्हणून या क्षेत्राकडे पाहिले जात नाही आणि त्यामुळेच शिवणकाम शिकताना व त्याचा उपयोग करुन कपडे शिवताना एक प्रकारचा यांत्रिकपणा पहावयास मिळेल.
जर का Passion सह शिकलात तर तुम्ही जाणीवपूर्वक या विषयाकडे पहाल, Fittings च्या नवनवीन Techniques, Different Body Types चा अभ्यास, कपडयाचा किंवा तयार ड्रेसचा Fall हवा तसा आलाय का ?, तिरक्या चुण्या, आडव्या चुण्या का पडल्या ? त्या मागची कारणे व कशा दुरूस्त करायच्या अशा अनेक गोष्टी शिकाल. पेपर कटिंगचे वेगवेगळे प्रकार तुम्ही आत्मसात कराल. थोडक्यात काय तर पारंपारिक पद्धतीने शिकतानाची विचारसरणी आता बदलली पाहिजे व नवीन प्रकारे करिअर म्हणून शिवणशास्त्र या विषयाकडे पाहिले पाहिजे. आणि स्वतःशी ठरविले पाहिजे "चला आपला फॅशन ब्रँडयशस्वी रित्या सुरू करू या".!!
हा ब्लॉग संपूर्ण वाचल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. आपले काही प्रश्न असतील, ज्याची उत्तरं तुम्हाला जर का वेळेत मिळाली तर नक्कीच तुम्ही तुमचा ऑनलाईन फॅशन ब्रँड यशस्वी रित्या सुरू करू शकाल, तर नक्की आपले प्रश्न कमेंंट बाॅक्स मध्ये लिहून पाठवा.
मानसी कोंयंडे
Co-Founder
Koyande's Institute of Fashion Studies





वा खूपच छान लिहिलं आहे मानसी ताई.
उत्तर द्याहटवाआपण
शिवणकलेकडे बघण्याची आपली मानसिकता बदलली तर आपला ही एक फॅशन ब्रँड बनू शकतो, अशा प्रत्येकासाठी हा ब्लॉग उपयुक्त👍👍
छान, खरंच passion and Career opportunities in Fashion industry कडे पहाण्याचा वेगळाच अनुभव प्राप्त झाला.
उत्तर द्याहटवाखुपच छान ब्लॉग लिहला आहे मानसी मैम
उत्तर द्याहटवाकिती उपयुक्त माहिती सहज सोप्या शब्दात आणि विचार करयला लावणारी ...
अनेक स्रिया मी आयुष्यभर शिवण काम करताना पाहिल्या आहेत...पण त्याना करियर क्षेत्रात किती मोठी संधी आहे....त्यांच्या कलेला किती मागणी आहे...हे माहितच नसते...
अश्या स्रियाना खरच तुमची तुमच्या मार्गदर्शनाची खुप मदत होइल
तुम्हाला खुप सुभेच्छा 💐
खूप छान ब्लॉग लिहिला आहे... आजू बाजूला अशीच मानसिकता आपण पाहतो आणि त्यामुळे fashion brand करण्याचा विचार कोणी करतच नाही...
उत्तर द्याहटवाखूप सुंदर ब्लॉग लिहिला आहे. या कडे करिअर म्हणून गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. हा ब्लॉग वाचून मानसिकतेमध्ये बराच फरक पडेल.
उत्तर द्याहटवाखूप छान मानसी ताई खरंच आपण शिवण कडे कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे👌👍👍
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रीतीने विषय हाताळला आहेस .
उत्तर द्याहटवा