आपल्या फॅशन ब्रँड चे नाव ठरवयाचे आहे का? मग नक्की वाचा या ७ स्टेपस्
Unique म्हणजेच थोडे वेगळे नाव शोधणे थोडे अवघड आहे ,परंतु काही steps आपण वापरल्या तसेच थोडेसे Brainstorming केले तर हे का सोपे आहे .
खाली दिलेल्या दिलेले ७ महत्त्वाच्या स्टेपस् आपल्याला आपल्या फॅशन ब्रँड चे नाव निवडण्यास उपयोगी पडतील.
१. आपल्या ब्रँड चे नाव ऐकल्यावर आपल्या संभाव्य ग्राहकाला काय फील आला पाहिजे? म्हणजेच नावातून प्राॅडक्टची माहिती त्यांना मिळते का? किंवा एखाद्या ठराविक वयोगटासाठी आपले प्राॅडक्ट आहे का? हे आपल्या फॅशन ब्रँड च्या नावातून त्यांना म्हणजेच आपल्या ग्राहकाला समजावे असे आपल्याला वाटते.
उदाहरणार्थ - "Purple Journey" म्हणजे purple या स्पेसिफिक रंगा व्यतिरिक्त इतरही कपडे ब्रँड मध्ये मिळतील, परंतु तुमच्य वाॅर्डरोबमध्ये एक तरी purple ड्रेस किंवा साडी असावी असे या नावातून समजू शकते.
जसे forever 21 हे नाव युथफूल वाटते.
२. इतर कोणी हे नाव वापरते आहे का ? एकदा तपासून पहा कारण आपले नाव ग्राहकांच्या नेहमी लक्षात राहावे म्हणून तुम्ही प्रयत्न करत आहात, परंतु जर का दुसरे कोणी हे नाव वापरत असेल तर सुरुवातीलाच आपण आपल्या फॅशन ब्रँड चे नाव बदललेले केव्हाही चांगले.
३. नाव खूप जास्त Trendy आहे का हे देखील लक्षात घ्यायला हवे. पुढील पाच ते दहा वर्षांत त्या नावाविषयी च्या भावना आज वाटत आहे तशाच भविष्यात वाटणे जास्त महत्त्वाचे आहे.
३. नाव खूप जास्त Trendy आहे का हे देखील लक्षात घ्यायला हवे. पुढील पाच ते दहा वर्षांत त्या नावाविषयी च्या भावना आज वाटत आहे तशाच भविष्यात वाटणे जास्त महत्त्वाचे आहे.
५. नाव उच्चारण्यास सोपे आहे का? याची देखील खात्री करून घ्या. कारण जितका नावाचा उच्चार सोपा तितके नाव लक्षात राहण्यास सोपे आणि तेवढेच आपले ग्राहक आपल्या प्रोडक्ट पर्यंत येणे देखील सोपे.
६. नाव छोटे आणि simple असेल तर लक्षात राहण्यास खूप सोपे ,विचार करण्यास सोपे आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या ऑनलाइन स्टोअरच्या हेडर वर किंवा वेबसाईट च्या होमपेजवर व्यवस्थित फिट होईल.
६. नाव छोटे आणि simple असेल तर लक्षात राहण्यास खूप सोपे ,विचार करण्यास सोपे आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या ऑनलाइन स्टोअरच्या हेडर वर किंवा वेबसाईट च्या होमपेजवर व्यवस्थित फिट होईल.
७. आपण निवडलेले आपल्या फॅशन ब्रँड चे नाव कायदेशीर रित्या वापरू शकतो का ?हे देखील पहाणे महत्त्वाचे आहे. कारण इतर कोणी ते नाव वापरत असेल तर आपण ते वापरू शकत नाही आणि चुकून वापरलेच तर पुन्हा नव्याने आपल्याला आपल्या फॅशन ब्रँड चे नाव बदलून त्याचे goodwill पुन्हा अस्तित्वात आणण्यास नव्याने ब्रँडिंग ऍक्टिव्हिटी कराव्या लागतील.
वरील सर्व मुद्दे लक्षात घेतल्यावर एक छोटी ब्रेनस्टॉर्मिंग ची ऍक्टिव्हिटी करूया, ज्यामुळे आपल्याला आपल्या फॅशन ब्रँड साठी युनिक नाव मिळेल.
यासाठी आपण विक्री करणार असणारे प्रॉडक्टची माहिती, ते विकताना ग्राहकांपर्यंत कोणत्या भावना पोहोचल्या पाहिजेत आणि आपल्याला आवडणारे काही अर्थपूर्ण शब्द या सर्वांशी निगडित काही शब्द, आपल्याला सुचतील त्याची एक लिस्ट तयार करा. साधारण वीस ते पंचवीस शब्दांची ही लिस्ट तयार झाली की त्याच्या जोडीला आणि काही वेगळे शब्द निवडा जे उच्चारताना छान वाटेल
(Note :- जमल्यास त्या नावाशी अर्थ प्रेरित करणारा एखादा संस्कृत किंवा फ्रेंच शब्द विचारात घेऊ शकता)
हे सर्व शब्द एका पेपरवर लिहा व त्याच्या जोड्या लावून पहा. कोणत्या शब्दाबरोबर दुसरा शब्द जातोय किंवा चांगला वाटतोय उदाहरणार्थ जर आपण kidswear प्रॉडक्ट वर फोकस करणार असाल तर मुलांविषयीच्या भावना या शब्द स्वरूपात येतील ,त्या शब्द स्वरूपात लिहा एक मिनिटांपेक्षा जास्त वेळ न घेता मनात येणारे शब्द लिहून काढा. त्याच्या जोडीला प्रॉडक्ट विषयीचे किंवा आपल्याला ग्राहकांपर्यंत ज्या भावना पोहोचवायच्या आहेत त्याच्याशी रिलेटेड शब्द लिहून काढा आणि जोड्या जुळवून किंवा न जुळवता एका फायनल नावाचा निर्णय घ्याआणि ते नाव फायनल करा .
काही प्रसिद्ध ब्रँड ची नावे आणि त्या मागची विचारधारा.
१. Amul :- हे नाव Anand Milk Union Limited या नावाचे संक्षिप्त रूप आहे . Anand हे गुजरात मधील एक शहर आहे ज्याला Milk Capital of India म्हणून ओळखले जाते.
२. AND:- हे ब्रँड Anita Dongre या फॅशन डिझाईनर चे आहे.त्यांच्या नावातील काही अक्षरे घेऊन हे ब्रँड चे नाव तयार झाले.
३. LEGO:- LEGO हे Leg godt या शब्दाचे शाॅर्ट फाॅर्म आहे.ज्याचा अर्थ डॅनिश मध्ये play wellअसा आहे.म्हणजेच चांगले खेळा!!!
४. addidas:- हे त्यांच्या फाऊंडर Adolf Dassler यांच्या नावाचे शाॅर्ट फाॅर्म आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की नावातली काही अक्षरे घेऊन देखील एखादं शॉर्ट अँड स्वीट असं नाव आपण ठेवू शकतो. जे थोडं इंग्लिश भाषेत असल्या सारखे असेल तर आपण ते वर्ल्ड वाईड वापरू शकतो.

निवडलेले नाव ट्रेडमार्क साइटवर जाऊन त्या नावाचा ट्रेडमार्क कोणी घेतला आहे का हे कन्फर्म करा .सोशल मिडिया साइटवर जाऊन पुन्हा एकदा ते नाव कोणी घेतले आहे का याची खात्री करा.एकदा का नाव फायनल झाले की लगेचच त्याचे .com हे domain विकत घ्या. जर तुम्हाला पुढे जाऊन काही समाजसेवेसाठी ऍक्टिव्हिटी करायच्या असतील तर .org हे domain देखील घेऊन ठेवा.
आणि हे सर्व झाले म्हणजेच आपण आपल्या फॅशन ब्रॅंड सुरू करण्याचे पहिले पाऊल उचलले आहे. यापुढे आपल्या नावाचा लोगो,रजिस्ट्रेशनस् आणि ब्रँडिंग शी रिलेटेड काही माहिती आपण क्रमाक्रमाने पुढील भागात पाहूया. हा ब्लॉग संपूर्ण वाचल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.
मानसी कोंयंडे
Co-Founder
Koyandes Inshitue of Fashion Studies

Wa
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर
छानच मानसी. Perfect
उत्तर द्याहटवाKhup chan mahiti dili aahe tai mastch
उत्तर द्याहटवासुंदर लेख
उत्तर द्याहटवाThank you so much for this information mam ❤
उत्तर द्याहटवाMuch needed while starting any business 👍
Chan ani important information
उत्तर द्याहटवाInformative 👍👍
उत्तर द्याहटवा